मलकापुर :- तालुक्यातील दुधलगाव (निपाणा)येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची आज्ञातांकडून 16 जून रोजी दरवाजे,खिडक्या व साहित्याची तोडफोड करण्यात आली त्या अनुषंगाने शिवसेना (उ.बा.ठा) शहरप्रमुख गजानन ठोसर सह पदाधिकाऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेखा जैन यांची भेट घेऊन आरोग्य उपकेंद्रात तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे मागणी केली तर दिवसापूर्वी मलकापुर ग्रामीण पो.स्टे.तोडफोडी संदर्भात गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी तोडफोड करणाऱ्या विरुद्ध तात्काळ कारवाई करण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पदाधिकाऱ्यांनी केली आहे.यावेळी शिवसेना शहर प्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपुत,तालुकाप्रमुख दीपक चांभारे, कामगार सेना शहर प्रमुख हरीदास गणबास,किसानसेना शहर प्रमुख सै.वसीम सै.रहिम, वाहतूकसेना शहरप्रमुख इम्रान लकी, शिवसेना उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे,उपशहरप्रमुख शकील जमादार,उपशहरप्रमुख समद कुरेशी,युवासेना तालुकाप्रमुख पवन गरुड,माजी नगरसेवक पांडुरंग चिम, विभाग प्रमुख राजेंद्र काजळे, आकाश बोरले,अक्षय सातव,विभाग प्रमुख गणेश सुशीर, विश्वनाथ पुरकर, गणेश सुरडकर, शांताराम धाडे,अमोल धाडे, गणेश पुरकर,दिपक कोथळकर,सह आदिंची उपस्थिती होती.
दुधलगांव येथील आरोग्य उपकेंद्राची तोडफोड करणाऱ्या विरुद्ध कारवाई तसेच सीसीटीव्ही बसविण्याची शिवसेना (उ बा ठा) ची मागणी
