Headlines

“म्हणे माझ्याशी लग्न कर, नाहीतर लग्नच होऊ देणार नाही; गुन्हा दाखल, खामगाव येथील घटना

खामगाव : एका तरुणीने मैत्री तोडल्यानंतरही तिचा पाठलाग करत तिला लग्नासाठी जबरदस्ती करणाऱ्या युवकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुटाळा खु. येथे राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीची गणेश गजानन कुन्हाडे (रा. खातखेड, ता. नांदुरा) याच्यासोबत मैत्री होती. मात्र, तरुणीने काही कारणास्तव त्याच्याशी संबंध तोडले. तरीही गणेश तिला वारंवार त्रास देत होता. रविवारी त्याने तरुणीच्या घरासमोर येऊन धमकी दिली – “माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी तुझे लग्न होऊ देणार नाही! तसेच माझ्या जीवाचे काही बरेवाईट करेल.” या प्रकरणी तरुणीने शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गणेश गजानन कुन्हाडे याच्याविरोधात कलम ७५, ७८, ३५१ (२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!