Headlines

आईने स्वतःसह चिमुकलीचेही अश्लिल फोटो पाठविले प्रियकराला, आईला अटक!

अकोला : डाबकी रोड पोलिस स्टेशन हद्दीतील आईने स्वतः सह पोटच्या आठ वर्षीय चिमुकलीचेही अंघोळ करतानाचे फोटो मोबाइलमध्ये काढून तिच्या प्रियकराला पाठवल्याची खळबळजनक घटना घडली असून, याप्रकरणी आरोपी आईला डाबकी रोड पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील डाबकी रोड पोलिस स्टेशन हद्दीतील रहिवासी असलेल्या आईने पोटच्या आठ वर्षीय चिमुकलीचे स्नानगृहामध्ये अंघोळ करीत असताना चोरून मोबाइलमध्ये फोटो काढले. सदर फोटो तिच्या प्रियकराला मोबाइलवर पाठविले. या घटनेची माहिती नातेवाइकांना कळल्यानंतर या गंभीर घटनेची डाबकी रोड पोलिस स्टेशनला पोलिसांनी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पोक्सो अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर, आरोपी आईला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास डाबकी रोड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धर्मराज सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!