Headlines

मुख्याधिकाऱ्याच्या गाडीवर काळं ऑईल फेकणाऱ्या प्रहार जिल्हा उपप्रमुख अजय टप याच्यावर गुन्हा दाखल

मलकापूर (प्रतिनिधी) – शहरातील आरोग्यम् हॉस्पिटलच्या कथित अवैध बांधकामावर कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी २ मार्च रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांच्या अधिकृत वाहनावर काळं ऑईल फेकून काळं फासल्याची खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी आज डॉ. शेळके यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अजय टप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्याधिकारी डॉ. शेळके यांच्या तक्रारीनुसार, “मी कार्यालयात असताना माझं शासकीय अधिग्रहित हुंडाई क्रेटा (क्र. एमएच १७ बीव्ही ८५९२) हे वाहन कार्यालयासमोर लावलेले असताना, अजय टप यांनी प्लास्टिकच्या बाटलीतून काळ्या रंगाचे ऑईल गाडीच्या समोरील काच व बोनटवर फेकले. त्यामुळे गाडीचे नुकसान झाले असून शासकीय कामात अडथळा निर्माण झाला,” असे नमूद आहे. या तोंडी तक्रारीवरून पोलिसांनी एनसी नं. २८६/२५ अन्वये कलम २२१, ३२४(३) बीएनएस नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद मुंडे करीत आहेत. या घटनेमुळे प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या प्रकारावर कठोर भूमिका घेण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!