Headlines

चिखली पोलिसांची मोठी कारवाई : २१ चोरीचे मोबाईल मूळ मालकांना परत

चिखली : – चिखली पोलिसांनी प्रभावी तपास करून विविध ठिकाणांहून चोरी गेलेले २१ मोबाईल हद्दीतून हस्तगत केले असून, ते मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने ही मोठी कारवाई केली. या मोबाईल्सची एकूण किंमत २ लाख ८६ हजार रुपये असून, वर्षभरात शेकडो मोबाईल शोधून परत करण्याच्या मोहिमेचा हा एक भाग आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची यशस्वी मोहिम..

चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानुसार, पोलीस कर्मचारी विजय किटे, सुनिल राजपूत, रुपाली उगले यांच्या पथकाला गहाळ मोबाईल शोधण्याची जबाबदारी देण्यात आली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे विविध ठिकाणी छापे मारून हे मोबाईल हस्तगत करण्यात आले.

पोलीसांचे नागरिकांकडून कौतुक..

कीमती मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलीस विभागाचे आभार मानले आहेत. मोबाईल चोरीच्या घटना वाढत असताना, पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि प्रभावी तपास कौतुकास्पद असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!