मलकापूर : -( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा )क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुल मलकापूर येथे १४ वर्षाखालील मुलांसाठी तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नूतन इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी विनय राजेश जामोदे याने चमकदार कामगिरी करीत तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आणि जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. विनयने स्पर्धेतील चारही राऊंडमध्ये उत्तम रणनीती वापरून प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले. त्याच्या या यशामुळे शाळेचे प्राचार्य श्री. सुरेश खर्चे, क्रीडा शिक्षक आकाश लटके सर, शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले आणि जिल्हास्तरावरही यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नूतन इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी विनय जामोदे तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय, जिल्हास्तरासाठी पात्र
