Headlines

बारदाना गोदामाला आग, ३० लाखांचे नुकसान; खामगाव शहरातील घटना!

खामगाव: स्थानिक भडगुर्जी जिन भागातील पाडिया यांच्या बारदाना गोदामाला काल पहाटे अचानक आग लागल्याने अंदाजे ३० लाखांचे नुकसान झाल्याची घटना घडली. ही घटना १७ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडली.

भडगुर्जी जिन भागात “अमेझर ट्रेडिंग कॉर्पोरेशन” या नावाने बारदान्याचे गोदाम आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच नगरपरिषद अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शेगाव आणि नांदुरा येथील अग्निशमन दलासही पाचारण करण्यात आले. जवळपास चार ते पाच तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. गोदामाजवळ नागरी वस्ती असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने आगीची तीव्रता जास्त नसल्‍याने मोठी हानी टळली. या आगीत सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!