मलकापूर:- तालुक्यातील बेलाड ग्रामपंचायत सरपंचाविरोधात ८ विरुद्ध शून्य मतांनी अविश्वास ठराव पारित करण्यात आला. अविश्वास ठरावावर तहसीलदार राहुल तायडे यांच्या अध्यक्षतेखाली ५ सप्टेंबर रोजी बैठक पार पडली. बेलाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह आठ सदस्यांनी २ सप्टेंबर रोजी विद्यमान सरपंच सचिन संबारे पाटील यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला होता. त्यात विकास कामात विश्वासात न घेणे, करवसुलीत पुढाकार न घेणे अशी कारणे देण्यात आली होती.