Headlines

मित्रांसोबत विहिरीवर आंघोळीसाठी गेलेल्या 23 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू,खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव : मित्रांसमवेत विहिरीवर अंघोळीसाठी गेलेल्या 23 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना खामगाव तालुक्यातील वझर येथे मंगळवारी उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार, विकास शंकर वाकोडे (२३) हा युवक गावातील काही मुलांसोबत शासकीय पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवर अंघोळीसाठी गेला. दरम्यान, विहिरीत बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी ५ ते मंगळवारी सकाळी ९ वाजतापूर्वी घडली. मंगळवारी त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याचे शंकर दानू वाकोडे (५५) यांनी हिवरखेड पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले. या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास हिवरखेड पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *