मलकापूर :- स्थानिक विज्ञान महाविद्यालय मलकापूर यांच्या रसायनशास्त्र विभागामार्फत तालुकास्तरीय आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धा 19 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेचे आयोजन विज्ञान महाविद्यालयातील पी.जी. केमिस्ट्री असोसिएशनने केले होते. या स्पर्धेत डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी, मलकापूर डॉ.व्ही.बी. कोलते कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मलकापूर व आयोजक विज्ञान महाविद्यालय मलकापूरच्या तीन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एप्टीटूड परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवून सहभागी झाल्या होते. या स्पर्धेत डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसीने प्रथम क्रमांक मिळवला व विज्ञान महाविद्यालयाने द्वितीय, तर डॉ. व्ही.बी. कोलते कॉलेज तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. या स्पर्धेत फिरता चषक डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी कॉलेजच्या चमूने मिळवला या चिमूमध्ये महाविद्यालयाच्या औषधी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.पवन चिंचोले यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाचे विद्यार्थी कु. भाविका आढाव , रोनक चंदेल , दीपक कल्याणकर आणि लोकेश भोजवानी यांनी सहभाग घेऊन प्रथम क्रमांक मिळवला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत देशमुख व शैक्षणिक प्रशासक डॉ.वैभव आढाव आणि संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री योगेंद्रजी गोडे साहेब तसेच संस्थेच्या सचिव माननीय तन्वीताई गोडे यांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले व या यशाबद्दल त्यांचे कौतुक व पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.