Headlines

लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी बाजारपेठ सजली, लाडक्या गणरायाच्या सजावटीच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी!

 

उमेश ईटणारे
मलकापूर :- लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी काही दिवसच शिल्लक राहिल्याने गणेश भक्तांनी बाप्पांच्या स्वागतासाठी बाजारपेठेत वेगवेगळ्या सामानांची खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांचीं बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळत आहे. येत्या 7 सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पांचे आगमन होणार आहे. बाप्पांच्या आगमनासाठी काही दिवसच शिल्लक राहिल्याने घरगुती गणपती बुक करण्यासाठी बाजारापेठेत नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. तसेच, नागरिक विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य घेण्यासाठी बाजारपेठेत गर्दी करत आहेत. मलकापूर शहरातील बुलढाणा रस्त्यावर, गजानन टॉकीज रोड, सत्यम चौक, अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी सुंदर सजावटींची दुकाने सजली आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची तयारी देखील पूर्ण होत आली असून देखाव्याची कामे अंतिम टप्प्यात आहे. गणपतीच्या डेकोरेशनसाठी कृत्रिम हार, फुलांच्या माळा, रंगीबेरंगी आकर्षक माळा, रंगीबेरंगी घंटा, आरास, मोरपीस तसेच इतर सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठ सजली असून खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *