जळगाव:- तालुक्यातील नशिराबाद येथील तरूण हा रेल्वे रूळ ओलांडत असताना धावत्या रेल्वेखाली आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.२४ रोजी रात्री ११ वाजता भादली रेल्वे स्टेशन जवळ उघडकीला आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अविनाश सुरेश देवरे (वय २७ रा. नशिराबाद ता. जळगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. जळगाव एमआयडीसीतील सिध्दार्थ केमीकल कंपनीत तो कामाला होता. नेहमीप्रमाणे २४ ऑगस्ट रोजी अविनाश देवरे हा कामाला निघून गेला. त्यानंतर भादली रेल्वेस्टेशन जवळ रेल्वे रूळ ओलांडत असतांना तो धावत्या रेल्वेखाली आल्याने त्याचा दुदैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला.
रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वे खाली आल्याने 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू!
