डोणगाव :- हिवरा आश्रम येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या गजानन नागोराव टाले (४७) यांचा अपघातात मृत्यू झाला. मेहकरहून हिवरा आश्रमकडे जात असताना मंगळवारी रात्री ८ वाजता ब्रह्मपुरी फाट्याजवळ ट्रक व दुचाकीचा अपघात झाला.
गजानन टाले हे मूळचे डोणगाव येथील रहिवासी होते. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.