Headlines

‘तू मला आधी जेलमध्ये का टाकल’ असे म्हणत महिलेच्या घरात घुसून मारहाण व विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा

देऊळगाव राजा :- तालुक्यातील देऊळगाव मही येथे एका महिलेच्या
घरात मध्यरात्री घुसून तिच्यावर मारहाण करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून प्रभाकर उत्तम खिल्लारे (रा. देऊळगाव मही) याच्याविरुद्ध कायम अप नं. १३३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७४, ३५१(२), ३५१(३) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २ एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरी घडली. फिर्यादी महिला घरात झोपलेली असताना दरवाजावर आवाज आल्याने त्यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी आरोपी दारात उभा होता. ‘तू मला आधी जेलमध्ये का टाकले?’ असा जाब विचारत आरोपीने महिलेचा हात पकडून तिला घराबाहेर ओढले व तिच्यावर वाईट उद्देशाने हात घालत विनयभंग केल्याचा आरोप आहे. दरम्यान, फिर्यादी व तिच्या मुलांनी आरडाओरडा केल्याने आरोपीने शिवीगाळ करत ‘तुम्हाला पाहून घेतो’ अशी धमकी दिली व घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, फिर्यादी व आरोपी यांच्यात पूर्वीपासून शेतीच्या कारणावरून वाद असल्याची माहिती समोर आली असून आरोपीवर यापूर्वीही गुन्हा दाखल असल्याचे समजते. या प्रकरणी ३ एप्रिल रोजी दुपारी गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस हवालदार नायबराव मोगल यांनी फिर्याद नोंदवली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कलीम देशमुख करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!