देऊळगाव राजा :- शहरातील विठाई नगर येथील महिला रमेश काबुकडे वय ५६ वर्ष या राहत्या घरी असताना एका अनोळखी इसमाने तुम्हाला स्कीम लागली घरातील दागिने दाखविण्यास सांगितले व महिलेस गाडीवर घेऊन जाऊन सातेफळ रोडवर नेऊन सोडले व परत फिर्यादीच्या घरी जाऊन पेटीत ठेवलेल्या थैलीतील दागिने अंदाजे किंमत दोन लाख ४४ हजार ७५० रुपये घेऊन फसवणूक करून फरार झाला. याबाबत सविस्तर वृत्त असे की विठाई नगर येथील रहिवासी निर्मला रमेश काबुकडे वय ५६ वर्ष यांनी स्थानिक पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की घटनेच्या वेळी घरी असताना एक अनोळखी मला घरी येऊन तुम्हाला स्कीम लागली आहे, असे सांगून घरातील दागिने दाखविण्यास सांगून ते पाहून घेऊन फिर्यादीस गाडीवर घेऊन गेला त्यांना सातेफळ रोड येथे नेऊन सोडले व परत घरी जाऊन पेटी ठेवलेले दागिने किंमत २ लाख ४४ हजार ७५० रुपये घेऊन फसवणूक केली. यामध्ये सोन्याचा नेकलेस ९ ग्रॅम चा किंमत ४५ हजार रुपये, २ सोन्याचे झुंबर १० ग्रॅमचे ५० हजार रुपये, सोन्याच्या कानातील वेल पाच ग्रॅम किंमत २५ हजार रुपये, सोन्याची पोथ २२ मनी व डोरले असलेली पाच ग्रॅम २५ हजार रुपये एक लांब पोथ १०० मणी असलेली व डोरल्याचा पत्ता असलेली दहा ग्रॅमची किमती पन्नास हजार रुपये, एक कानातील फुल दीड ग्रॅमचे किंमत साडेसात हजार रुपये, सोन्याचे गणपती मूर्ती दोन ग्रॅमची किंमत १० हजार रुपये, ८ ग्रॅमचे वीस गोल मणी, २ ग्रॅम ची किंमत १० हजार रुपये असे एकूण सोन्याचे दागिने ४४ ग्रॅम पॉईंट पाच ग्रॅम असून अशा लेखी तक्रारीवरून स्थानिक पोस्टेमध्ये कलम ३१८(४) बीएनएसननुसार गुन्हा दाखल केला आहे.