मलकापूर:- तालुक्यातील धरणगाव येथे 21 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना आज दि. 14 जून रोजी सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून हत्येचा शोध घेण्यासाठी श्वान पथक सुद्धा पाचारण करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 ते 5 संशयितांना ताब्यात घेतले असून गुन्हाची उकल सुरू आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील धरणगाव येथील ग्रामस्थ सकाळी 5.30 च्या सुमारास शौचालयाला जात असतांना खंडोबा मंदिरानजीक त्यानां कोणाला तरी फरफटत नेले असल्याचा रक्ताचा सडा दिसून आला. रक्ताला सडा पडेल असलेल्या दिशेने ग्रामस्थ गेले असता त्यानां दगडाने व लाठ्याने मारलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळुन आला. या बाबतची माहिती त्यांनी पोलीस पाटील यांना दिली. त्यांनी तात्काळ मलकापूर शहर पोलिसांना दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृत तरुणाची झळती घेतली असता त्याच्या मोबाईलवर संपर्क करण्यात आल्याने ओळख पटली. मृत तरुणाचे नाव दिपक सुधाकर सोनवणे वय 21 वर्षे राहणार तालुका मोताळा असे आहे. या घटनेत मृतक दीपक यांच्यावर दगडाने किंवा काठीने जबर मारहाण करण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्याला मारून रक्ताच्या थारोड्यातून तीस फूट मृतदेह फरपटात नेल्याने रक्ताचा सडा ओपन सभागृहामध्ये दिसून आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन ते पाच जणांना ताब्यात घेतले आहे.