मलकापूर :- दुकानाच्या जागेच्या वादातून एका महिलेला चाकू मारून जखमी केल्याची घटना शहरात घडली असून, या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौ. वैशाली निलेश भारंबे (वय ३२, रा. गोकुलधाम नगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दुकानाच्या जागेच्या कारणावरून सुरेखा विलास लांबोडे (वय ४५), शुभम विलास लांबोडे (वय २३, दोन्ही रा. गाडेगाव मोहल्ला) तसेच इतर दोन अनोळखी महिलांनी शिवीगाळ केली. वाद वाढत असताना शुभम लांबोडे याने लहान चाकूने फिर्यादीच्या हातावर वार करून जखमी केल्याचा आरोप आहे. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. इतर दोन महिलांनीही शिवीगाळ केल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेनंतर फिर्यादीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत झेंडगे करीत आहेत.
