पैशांच्या मागणीवरून मानसिक-शारीरिक छळ; आठ जणांवर खामगाव पोलिसांत गुन्हा दाखल!

 

खामगाव :- प्लॉट खरेदीसाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याच्या आरोपावरून शहर पोलिसांनी पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई २० फेब्रुवारी रोजी करण्यात आली. हरीफैल परिसरातील मीना राहुल खरात (वय २८) यांचा विवाह जालना जिल्ह्यातील खांडसरी लालबाग येथील राहुल खरात (वय ४२) याच्यासोबत झाला होता. तक्रारीनुसार, विवाहानंतर काही दिवसांनी पती व त्याच्या कुटुंबीयांनी प्लॉट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, असा तगादा लावण्यास सुरुवात केली. पैसे न आणल्यास शिवीगाळ, मारहाण तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देत सातत्याने छळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या त्रासाला कंटाळून संबंधित महिला माहेरी खामगाव येथे परतली आणि शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार, पती राहुल खरात, सासरे बाबूराव संपतराव खरात, सासू पंचफुला खरात, दीर विकास खरात, दिराणी वैशाली खरात, मनोज खरात, नणंद वर्षा गणेश गवई आणि गणेश रघुनाथ गवई यांनी २०१६ ते २०१७ या कालावधीत संगनमताने छळ केल्याचा आरोप आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!