Headlines

माझे सोबत राहा मी म्हणेल तसे कर नाहीतर तुझे सर्व फोटो व्हायरल करतो,फोटो व्हायरलची धमकी देवून पैशाची मागणी : आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

शेगाव : पुणे येथे कामास गेलेल्या तालुक्यातील एका २४ वर्षीय कुमारिके सोबत फेसबुकवर मैत्री करून तिला आमिष देत अनैतिक संबंध प्रस्थापित केले व नंतर मारहाण करून पैशांची मागणी करणाऱ्या आरोपीवर शहर पोलिसात १६ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडितेच्या ५८ वर्षीय वडिलांनी शेगांव ग्रामीण पोलिसांत दिलेल्या तक्रारी नुसार, माझी लहान मुलगी बी. कॉम झालेली असुन ती नोकरी निमित्य पुणे येथे गेलेली होती. पुणे येथे राहत असतांना सचिन साहेबराव जोगदंडे वय २८ वर्षे, रा. चिचोली, ता फुलंब्री, जि. औरंगाबाद याने तिचेसोबत फेसबुकवर मैत्री केली. त्याचे बाबत संपुर्ण खोटी माहीती देवुन तिला जाळ्यात अडकवीले. त्यातुन वरील आरोपी याने आमीष दाखवुन तिचेसोबत अनैतीक संबंध प्रस्थापीत करुन मुलीचे फोटो व व्हीडीओ तिचे नकळत बनवुन त्यामध्ये कॉम्युटरचे सहाय्याने दुरुस्ती करुन ते माझ्या नातेवाईकांमध्ये व्हायरल करेल, अशा धमक्या देवून तिला ब्लॅकमेल करीत तीला वेळोवेळी मारहाण केली व तु माझे सोबत राहा मी म्हणेल तसे कर नाहीतर तुझे सर्व नग्न फोटो व्हायरल करतो, अशा धमक्या दिल्याने माझी मुलगी ही त्याचे दबावात त्याचेसोबत राहत होती. आरोपीसोबत त्याचे अज्ञात तिन ते चार मित्र हे सुध्दा या गैरकृत्याकरीता त्याला सहकार्य करीत आहेत. आरोपी व त्यांच्या मित्रांनी माझ्या मुली वर दबाव आणुन व वेगवेगळ्या फोन वरून फोन करुन पैशाची मागणी केली. ९ मे रोजी आरोपीने मला फोन करुन तुझी मुलगी प्यारी असेल तर दोन लाख रुपये आणुन दे नाही तर तीचे फोटो व व्हीडीओ मी तुमचे सर्व नातेवाइकांचे फोन वर पाठविन मला पैसे दिले नाही तर मी तीला धंदयावर बसविन, असे फोन वरुन धमकी दिली व तीला फोन सुरु असतांना मारहाण केली. अशा फिर्यादीच्या रिपोर्ट वरुन पोलिसांनी भादवि कलम ३८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *