चिखली:- शहरात भरधाव बोलेरो वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ३ फेब्रुवारी रोजी घडली.
गीता अनिल सोळंकी (३८, रा. हरिओमनगर) या आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून घराकडे जात होत्या. घराजवळ पोहोचत असताना उजवीकडे वळत असताना पाठीमागून येणाऱ्या बोलेरोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत गीता सोळंकी रस्त्यावर कोसळल्या आणि गंभीर जखमी झाल्या. नातेवाईकांनी त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सासू-सासरे, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मूळगाव येवता येथे ४ फेब्रुवारीला अंत्यसंस्कार करण्यात आले.