रानडुकराला वाचवताना कारचा अपघात; चौघेजण जखमी, जीवितहानी टळली
देऊळगाव कुंडपाळ :- देऊळगाव कुंडपाळ-आमराई पाटी मार्गावर अचानक रस्त्यावर आलेल्या रानडुकराला वाचवण्याच्या प्रयत्नात चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याची घटना बुधवारी घडली. या अपघातात चारजण जखमी झाले असून चारचाकी आणि दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सतीश पाटील नरवाडे हे पुणे येथील आपल्या मित्रांसह चारचाकी (एमएच 14 एमव्ही 8967) ने देऊळगाव कुंडपाळकडे येत…
