पोलिसांमुळे वाचला तरुणीचा जीव, घरच्या लोकांच्या मर्जी विरुद्ध लग्न केल्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने जंगलात घेऊन जात होते दोन मामा आजी,मुलीचा जीव वाचवणाऱ्या पोलिसांवरही हल्ला
आलेगाव : घरच्या लोकांच्या मर्जीविरुद्ध लग्न केल्यामुळे भाचीला खोट्या प्रतिष्ठेपायी जिवे मारण्याच्या इराद्याने (ऑनर किलिंग) जंगलात घेऊन जात असलेल्या तीच्या दोन मामा व आजीला रोखले असता त्यांनी पोलिस कॉन्स्टेबल उमेश सांगळे यांच्यावर हल्ला केला. ही घटना १२ जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पातूर तालुक्यातील आलेगाव पोलिस चौकी अंतर्गत नवेगाव ते पिंपळडोळीदरम्यान रस्त्यावर घडली. या…
