शेलापूर बसस्थानकात वादातून दोघांना मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा
मोताळा :- तालुक्यातील शेलापूर येथे ९ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या वादातून दोघांना मारहाण झाल्याची घटना घडली असून, याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळणी येथील रहिवासी आकाश सुरेश बोदडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या भाच्यासोबत जेवणानंतर शेलापूर बसस्थानक परिसरात थांबले होते. यावेळी शेलापूर येथील दीपक बोरसे याने त्यांच्याशी कारण नसताना वाद…
