धर्मवीर बलिदान मास पाळणे हे प्रत्येक हिंदूंचे आद्यकर्तव्य – ह भ प माधव महाराज पाटील

    मलकापूर :- आजच्या धावपळीच्या युगात जिवन जगणारा आजचा हिंदू हा आपल्या संस्कृती, संस्कार, विचार, आचार, कर्तव्य,धर्म ह्यापासून दूर चाललेला आहे,नोकरी,पैसा,पत्नी,गाडी, बंगला ह्यालाच तो आपलं सर्वस्व समजून बसला पण ज्याला तो सर्वस्व समजून बसलाय त्याला ते सर्वस्व प्राप्त होण्यामागे सर्वात मोठा सिंहाचा वाटा जर कुणाचा असेल तर तो पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि…

Read More

जुन्या वादातून तरुणावर लोखंडी कड्याने हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा! मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : – संत रोहिदासनगर परिसरात जुन्या वादातून २१ वर्षीय तरुणावर लोखंडी कड्याने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून दोन जणांविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरेंद्र भारत पठे (वय २१) हे १७ फेब्रुवारी रोजी घरासमोर उभे असताना आरोपी विशाल रामलाल बछीरे…

Read More

चोरट्यांमुळे दाताळा गाव अंधारात; चोरट्यांनी असं काय केलं?

  मलकापूर :- तालुक्यातील दाताळा शिवारात अज्ञात चोरट्यांनी महावितरणच्या दोन डीपींवरील सुमारे ३००० मीटर लांबीची अॅल्युमिनियम विद्युत तार चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारीच्या रात्री १० वाजेपासून ते १६ फेब्रुवारीच्या पहाटे ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी घडली. गावकरी व…

Read More

मलकापूर तालुक्यातील 20 वर्षीय तरुणी बेपत्ता! मलकापूर ग्रामीण पोलिसांत नोंद

  मलकापूर :- तालुक्यातील सिराढोण येथे २० वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. तुकाराम चहादु राणे (वय ४८) हे १२ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे शेतातील काम आटोपून घरी आले होते. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ते गुरांना चारा-पाणी करण्यासाठी बाहेर गेले. त्या वेळी त्यांची…

Read More

मलकापुरात किरकोळ वादातून कुऱ्हाडीने हल्ला; २१ वर्षीय तरुण गंभीर जखमी, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

    मलकापूर : – शहरातील गणवाडी रोडवरील गोरक्षण शेत परिसरात बैलगाडा शर्यतीचा सराव पाहण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणावर किरकोळ कारणावरून कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सायकलपुरा परिसरातील सैयद शहनवाज सैयद नाशीर (वय २१) हा १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गणवाडी रोड परिसरात…

Read More

अभ्यासिका इमारतीला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याच्या प्रस्तावास नप सभेत एकमताने मंजुरी; बहुजन उद्धारक सेवा समितीच्या पाठपुराव्याला यश

मलकापूर:- नगर परिषदेच्या अखत्यारीतील चाळिबिघा परिसरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या अभ्यासिका इमारतीला ‘ ज्ञानज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ हे यांचे नाव देण्याच्या प्रस्तावास नप सदस्यांनी सर्वानुमते मंजुरी दिली. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दि. १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. बहुजन उद्धारक सेवा समितीच्या वतीने मागील तीन वर्षांपासून सातत्याने करण्यात येत…

Read More

घरातून सकाळी निघाली… अन् परतलीच नाही! वडोद्यातील २० वर्षीय तरुणी बेपत्ता; पोलिसांत मिसिंग दाखल

मलकापूर : तालुक्यातील वडोदा परिसरातून एक २० वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सकाळी घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडलेली ही तरुणी अद्याप परत न आल्याने कुटुंबीय चिंतेत असून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाणे येथे मिसिंगची नोंद करण्यात आली आहे. याबाबत कमलेश कोल गणपत कोल (रा. अडगाळ, ता. रामपूर, जि. सिधी, मध्य प्रदेश;…

Read More

जमिनीच्या वादातून वरखेड येथे आई-मुलीवर हल्ला; मुलगा-सुनेविरुद्ध गुन्हा दाखल!

  मलकापूर : – जमिनीच्या वाटणीवरून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाने उग्र रूप धारण करत वरखेड येथे आई व मुलीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी मुलगा व सुनेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वनमाला प्रल्हाद इंगळे (वय ५५), मूळ रा. वरखेड, सध्या सुरत (गुजरात) येथे वास्तव्यास आहेत. जमिनीच्या वाटणीबाबत चर्चा करण्यासाठी त्या…

Read More

विदर्भ लाईव्हचा दणका! बातमीचा इम्पॅक्ट, गजानन टॉकीज रोडवरील खड्ड्यावर प्रशासनाचा तातडीचा धापा

  मलकापूर : – शहरातील नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला अखेर विदर्भ लाईव्हच्या वृत्ताने जाग आणली आहे. मलकापूर शहरातील गजानन टॉकीज रोडवरील जीवघेण्या खड्ड्याबाबत विदर्भ लाईव्हने केलेल्या सडेतोड बातमीचा तात्काळ इम्पॅक्ट दिसून आला असून, प्रशासनाच्या वतीने संबंधित खड्ड्यावर धापा टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. दररोज वाहनचालकांना अडचणीत…

Read More

अनुदानासाठी लाच मागणारा कृषी पर्यवेक्षकाला रंगेहात पकडला; मलकापूरमध्ये एसीबीची कारवाई!

मलकापूर :- शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली लाचखोरीचा खेळ सुरूच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. कृषी अनुदानाची प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या मलकापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने कृषी विभागात खळबळ उडाली आहे. कृषी यांत्रिकीकर उप-अभियान योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याने कृषी विभागाच्या पूर्वसंमतीने मळणी यंत्र…

Read More
error: Content is protected !!