विवाहितेवर लाकडी काठीने हल्ला; पतीसह चौघांवर गुन्हा, मलकापूर शहरातील घटना!

  मलकापूर :- शहरातील हनुमाननगर परिसरात कौटुंबिक वादातून २८ वर्षीय विवाहितेवर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. माहितीनुसार, शुभांगी विनोद मोरे (वय २८) यांच्या घरी २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. आरोपी विनोद रमेश…

Read More

मलकापूर तालुक्यातील दाताळा येथे मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; एकाविरुद्ध गुन्हा

  मलकापूर :- तालुक्यातील दाताळा येथील एका घरात विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून गेल्या वर्षभरापासून वीजचोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक अभियंता संदीप मधुकर श्रीधनकर (मलकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मोहम्मद शाह बादशाह आसखान (वय ६०, रा. इंदिरा नगर, दाताळा) यांच्या घरी तपासणीदरम्यान मीटरची बॉडी उघडून न्युट्रल सीटीची…

Read More

मलकापूर तालुक्यातील उमाळी येथे आकोडा टाकून वीजचोरी; एकाविरुद्ध गुन्हा

  मलकापूर :- तालुक्यातील उमाळी येथे लघुदाब विद्युत वाहिनीवर थेट आकोडा टाकून वीजचोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक अभियंता संदीप मधुकर श्रीधनकर (मलकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रल्हाद राजाराम सातव (वय ६०, रा. उमाळी) यांच्या राहत्या घरी तपासणीदरम्यान सुमारे २० फुट लांबीची काळ्या रंगाची वायर वापरून…

Read More

छताला दोरी बांधून 51 वर्षीय इसमाने संपविली जीवनयात्रा; मलकापूर तालुक्यातील हरसोडा येथील घटना!

मलकापूर : – तालुक्यातील हरसोडा गावात एका ५१ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. मृत व्यक्तीचे नाव वाल्मीक पंढरी झाल्टे (रा. हरसोडा) असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री त्यांनी घराच्या छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले आहे. रविवारी सकाळी हा प्रकार लक्षात…

Read More

मानवधर्माचे संशोधक, स्वच्छतेचे प्रणेते राष्ट्रसंत गाडगे महाराज

  मलकापूर :- संपूर्ण भारत या राष्ट्रांमध्ये एकमेव महाराष्ट्र आहे की बाराव्या शतकापासून किंबहुना त्यापूर्वी देखील या राज्यात संत साहित्याची, वारकरी संप्रदायाची, समतेची, न्यायाची, बंधूतेची, भक्तीची शिकवण येथील सर्व जनमानसामध्ये रुजत आली आहे. भक्त आणि भगवंत यांच्यामधील दुवा हा संत असतो. संतांनी दिलेली शिकवण व परमेश्वराची ओळख ही लोकांच्या मनामनामध्ये चिरकाल टिकते.महाराष्ट्रातील संत परंपरेतील एक…

Read More

निरंकारी मिशनच्या ‘प्रोजेक्ट अमृत’चा चौथा टप्पा, ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या दिशेने एक सार्थक पाऊल

  मलकापूर :- संत निरंकारी मिशनची सेवा भावना आणि मानव कल्याणाचा संकल्प साकार करण्याच्या हेतुने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ परियोजनेच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ रविवार, दि.22 फेब्रुवारी 2026 रोजी परम श्रद्धेय सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि सत्कारयोग्य निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात यमुना नदीच्या छठ घाट, आई.टी.ओ., दिल्ली येथे केला जात आहे….

Read More

नूतन इंग्लिश स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

  मलकापूर :- छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील नूतन इंग्लिश स्कूलमध्ये २० फेब्रुवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेला. कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. शाळेचे प्राचार्य सुरेश खर्चे, उपप्राचार्य अमोल चोपडे तसेच प्रदीप कोलते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून…

Read More

पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी

  मलकापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे…

Read More

ढोल-ताशांच्या गजरात दुमदुमली नगरी; “जय भवानी, जय शिवराय”च्या घोषणांनी भारावले मलकापूर

  मलकापूर ( दिपक इटणारे ) : ढोल, ताशे आणि तुतारींच्या निनादात आसमंत दुमदुमला… पोवाड्यांतून उलगडणारी हिंदवी स्वराज्याची तेजस्वी गाथा… भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेली तरुणाई… आणि “जय भवानी, जय शिवराय”च्या गगनभेदी घोषणांनी थरारलेली नगरी! अशा ओसंडून वाहणाऱ्या उत्साहपूर्ण वातावरणात विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापूर येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा…

Read More

ग्राम आळंद येथे पारंपरिक दिंडीने शिवजयंती उत्साहात साजरी

  आळंद :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ग्राम आळंद येथे तरुणांच्या पुढाकारातून पारंपरिक पद्धतीने दिंडी काढून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डीजेच्या गोंगाटाला फाटा देत टाळ-मृदंगाच्या निनादात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. शिवभक्तांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून गावातील मुख्य मार्गावरून दिंडी काढली. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला….

Read More
error: Content is protected !!