Headlines

उभ्या ट्रकला कारची धडक, अपघातात सानंदा परिवारातील तिघे जखमी!

खामगाव : जालना नजीक उभ्या ट्रकवर कार धडकून झालेल्या अपघातात खामगावातील सानंदा कुटुंबातील तिघे जखमी झाल्याची घटना ५ ऑगस्ट रोजी पहाटे घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार असे की, सानंदा कुटुंबातील काहीजण पूणे येथून कार क्र. एमएच २८-एएन २१९१ ने खामगावकडे निघाले होते. दरम्यान पहाटे ४.३० वाजेच्या…

Read More

सततची नापिकी त्यात डोक्यावर “बँकेचे कर्ज’ अल्पभूधारक शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल..

आसलगाव : सततच्या नापिकीमुळे त्यात डोक्यावर बँकेचे कर्ज या विवचनेतून येथील अल्पभूधारक शेतकरी अरुण दयाराम बघे वय वर्ष ५२ यांनी दि.३० जुलै रोजी आत्महत्या केली.याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या काही वर्षापासून सतत होत असलेल्या नापिकीमुळे व मागील वर्षी सुद्धा बोगस बियाणे मिळाल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. अरुण बघे यांच्याजवळ १.११ आर इतकी…

Read More

घरात गळफास घेऊन 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या, रोहिणखेड येथील घटना

धामणगाव बढे: राहत्या घरात गळफास घेऊन पंचवीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रोहीणखेड येथे २६ जुलै रोजी घडली. विशाल राजू दसरे (२५) असे मृतक युवकाचे नाव आहे. याबाबत नामदेव फकिरा दसरे यांनी धामणगाव बढे पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यात विशाल याने राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास घेतल्याचे…

Read More

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एक ठार,एक जखमी, पिंपळगाव काळे फाट्यावरील घटना

बी बी:- साखरखेर्डाः चिखली-मेहकर मार्गावर पिंपळगाव काळे फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली या अपघातामध्ये हिवरा आश्रम येथील उमेश अप्पा खेमेकर वय (४५) यांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. ही घटना २४ जुलै रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. हिवरा आश्रम येथील उमेश अप्पा गणेश अप्पा खेमेकर हे चिखली येथून हिवरा आश्रम येथे…

Read More

कटलरी सामान आणण्यासाठी गेलेली विवाहिता चार वर्षीय चिमुकलीसह बेपत्ता, शेगाव येथील घटना

शेगाव:- कटलरी सामान आणण्यासाठी गेलेली विवाहिता चार वर्षीय चिमुकलीसह बेपत्ता झाल्याची घटना दि.21जुलै रोजी तेली पुरा भागात घडली आहे, ( आरती प्रमोद माठे,वय 25 वर्ष )( दिशीका प्रमोद माठे,वय 4 वर्षे ) असे बेपत्ता झालेल्या आई मुलीचे नाव आहे. याबाबत प्रमोद विठ्ठल माठे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ते शीतला माता मंदिर…

Read More

मलकापूरातील कु.सलोनी किरण साळुंके हिची ओडीसा भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत निवड

मलकापूर :-स्थानिक छत्रपती शिवाजी नगरातील कुमारी सलोनी किरण साळुंके हिची ओडीसा भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत निवडझाली आहे. सविस्तर माहिती अशी पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी मध्ये सलोनी हिने 11 वर्षे आतील वयोगटात 200 मीटर फ्रि स्टाईल (2.35.मिनीट) तथा 100 मीटर फ्रि स्टाईल (1.10 मिनिट) प्रथम क्रमांक पटकाविला तसेच 100 मीटर…

Read More

अनोळखी महिलेचा आढळला मृतदेह, घातपाताचा संशय? शवविच्छेदन अहवालानंतर सत्य येणार समोर

साखरखेर्डा : येथील पोलिस ठाण्यापासून तीन किमी अंतरावर असलेल्या गुंजमाथा शिवारात एका अनोळखी महिलेचा मृतदेह २४ जुलै रोजी आढळून आला. अडचणीच्या ठिकाणी हा मृतदेह आढळून आल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहे. दरम्यान, मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. साखरखेर्डा मंडळात गुंज माथा हे उजाड गाव असून, या शिवारात सवडद, साखरखेर्डा, गुंज येथील शेतकऱ्यांची शेती आहे. साखरखेर्डा…

Read More

अपहरण झालेल्या दहा वर्षीय चिमुकल्याचा आत्या भावानेच केला खून, चिखली तालुक्यातील घटना

चिखली :- दहा वर्षीय चिमुकल्याचा आतेभावानेच खून केल्याची घटना चिखली तालुक्यातील अंबाशी येथे घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.दि २२ जुलैला अरहानचे अपहरण झाले असल्याची तक्रार आई-वडिलांनी पोलीस स्टेशनला दिली होती. तक्रारीत त्यांनी म्हटले होते की अरहान हा सकाळी खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. सायंकाळी अरहान उशिरापर्यंत घरी न आल्याने आई-वडिलांनी सर्वत्र त्याचा शोध…

Read More

पत्नी माहेरी गेलेले असताना पतीने घरात गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा! साखरखेर्डा येथील घटना

साखरखेर्डा : पत्नी माहेरी गेलेली असताना शिवाजीनगर येथील एका इसमाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २० जुलै रोजी दुपारी पोलिस स्टेशनअंतर्गत घडली. सुनील सिद्धार्थ इंगळे असे मृत इसमाचे नाव आहे.शिवाजीनगर येथील रहिवासी सुनील सिद्धार्थ इंगळे (वय ३५) हा कुटुंबासह वास्तव्यास होता. काही दिवसांपूर्वी पत्नी माहेरी गेल्याने तो एकटाच घरी राहत होता. त्याने शनिवारी घरातील…

Read More

झाडाला गळफास घेऊन 65 वर्षीय वृद्धाची आत्महत्या! देऊळगाव राजा येथील घटना

देऊळगाव राजा:- येथील धोंडीराम मठासमोर असलेल्या एका झाडाला गळफास घेऊन ६५ वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना १९ जुलै रोजी सकाळी उघडकीस आले. गुलाबराव बालाजी उगले (६५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. स्वप्नील विष्णू रामाने सकाळी रस्त्याने जात असतांना त्यांच्या ही घटना निदर्शनास आली. त्यांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, गुलाबराव बालाजी उगले यांनी नेमक्या…

Read More
error: Content is protected !!