अज्ञात वाहनाच्या धडकेत महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू!

  देऊळगाव राजा :- जालना रोड बायपास परिसरात भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने महावितरणमध्ये कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. निकेत सुरेश मिनासे (वय 42, रा. बालाजी मंदिराजवळ, देऊळगाव राजा) असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 12 मार्च रोजी रात्री…

Read More

जवळखेड येथे तीन घरफोड्या; 1 लाख 10 हजारांची रोकड लंपास!

देऊळगाव राजा :- तालुक्यातील जवळखेड गावात मंगळवारी सायंकाळी अज्ञात चोरट्यांनी तीन घरांचे कुलूप तोडून सुमारे 1 लाख 10 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जवळखेड येथील शेतकरी देविदास आश्रुबा गाटोळे (वय 44) यांनी…

Read More

नाकाबंदीत कारमधून धारदार गुप्ती जप्त; युवक पोलिसांच्या ताब्यात!

देऊळगाव राजा :- पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीदरम्यान एका कारमधून विनापरवाना धारदार गुप्ती आढळून आल्याने एका युवकाला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत सुमारे 1 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई 9 मार्च रोजी सायंकाळी देऊळगाव राजा-सिंदखेड राजा मार्गावरील जनता सेवा जिनिंगसमोर करण्यात आली. पोलिस संशयित वाहनांची तपासणी करीत असताना एमएच 12 जीएफ- 8067…

Read More

मेहुणाराजा येथे दुकानात घुसून महिलेला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा!

देऊळगाव राजा : – तालुक्यातील मेहुणाराजा येथे दुकानात घुसून एका महिलेला धक्काबुक्की व मारहाण केल्याची घटना 8 मार्च रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रिती बाबासाहेब नांदवे (वय 28, रा. दगडवाडी, ता. देऊळगाव राजा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार उद्धव उत्तम सुरडकर (वय 34…

Read More

सिंदखेड राजा टी-पॉइंटवर अज्ञात वाहनाची धडक; युवकाचा मृत्यू!

देऊळगाव राजा :- शहरातील सिंदखेड राजा टी-पॉइंट येथे सोमवारी (दि. २३) पहाटे झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. धडक देणारा वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृत युवकाचे नाव प्रकाश सदाशिव कांबळे (रा. देऊळगाव राजा) असे आहे. याप्रकरणी सदाशिव काशीनाथ कांबळे (वय ७०, रा. त्र्यंबक नगर) यांनी देऊळगाव राजा…

Read More

खडकपूर्णा नदीपात्रात महसूलचा दणका; दोन टिप्पर पोलिसांच्या ताब्यात

  देऊळगाव राजा : – खडकपूर्णा नदीपात्र व धरण परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाने पहाटेच्या सत्रात मोठी कारवाई केली. नारायणखेड परिसरात टाकलेल्या धाडीत दोन टिप्परांसह सुमारे सहा ब्रास रेती जप्त करण्यात आली असून वाहनांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार वैशाली डोंगरजाळ…

Read More

पैशाच्या वादातून युवकावर विळ्याने हल्ला; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल! देऊळगाव राजा येथील घटना

  देऊळगाव राजा :- शहरातील समतानगर भागात पैशाच्या वादातून एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना ५ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून देऊळगाव राजा पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.माहितीनुसार आकाश खंदारे याच्याकडे सोयाबीन विक्रीसंबंधी इसाराचे काही पैसे देणे-घेणे प्रलंबित होते. याच कारणावरून वाद निर्माण…

Read More

कर्जबाजारीपणाचा मानसिक ताण सहन न झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; देऊळगाव राजा तालुक्यातील घटना!

देऊळगाव राजा : – कर्जाच्या ओझ्याने त्रस्त झालेल्या मेहुना राजा येथील अल्पभूधारक शेतकरी किशोर श्यामराव डोंगरे (वय ४५) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. किशोर डोंगरे यांनी शेतीसाठी विविध बँकांकडून कर्ज घेतले होते. याशिवाय दोन मुलींच्या लग्नाचा मोठा आर्थिक खर्च आणि नियमित बँक हप्त्यांचा ताण त्यांच्या डोक्यावर होता. अवघ्या…

Read More

रस्ता खचल्याने दुर्दैवी अपघात; तीन भावंडांपैकी एकाचा मृत्यू, देऊळगावराजा तालुक्यातील घटना

देऊळगावराजा (खल्याळ): गव्हाण शिवारात रस्ता खचून तीन सख्खे भाऊ मलब्याखाली अडकण्याची दुर्दैवी घटना २५ डिसेंबर रोजी घडली. या घटनेत दोन भावांना सुखरूप वाचवण्यात यश आले, मात्र एका भावाचा मृत्यू झाला.डोलखेड येथील डोईफोडे कुटुंबातील बद्री (४०), संदीप (३८), आणि दिलीप (३२) हे तीन भाऊ खल्याळ गव्हाण ते सिनगाव जहागीर रस्त्यावर शेतसिंचनासाठी पाईपलाईनच्या लिकेजमध्ये छडी टाकण्याचे काम…

Read More

दिव्यांग युवकाची गळफास घेऊन आत्महत्या, देऊळगाव राजा येथील घटना!

  देऊळगाव राजा : शिवाजीनगर परिसरातील २२ वर्षीय दिव्यांग युवक संदीप साबळे याने वैफल्यग्रस्त अवस्थेत स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २५ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. संदीपने घरात कोणी नसताना गळफास घेतला. त्याची आई घरी परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. दोन वर्षांपूर्वी अपघातामुळे त्याचे दोन्ही पाय निकामी झाले होते, त्यामुळे तो सतत…

Read More
error: Content is protected !!