अल्पवयीन मुलगी बेपत्ता; जेसीबी ऑपरेटरवर संशय, गुन्हा दाखल
अंढेरा : – गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली असून, पोलिसांनी संशयित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावात सोलर प्लांटचे काम सुरू आहे. या ठिकाणी जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करणारा मुकेश शामराव मंझा (रा. हरणी, ता. चिखली) हा संबंधित मुलीशी संपर्कात होता, अशी माहिती समोर…
