Headlines

कर्जबाजारीपणाच्या तणावातून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; रायपूर येथील घटना!

 

बुलढाणा :- तालुक्यातील रायपूर येथील तरुण शेतकरी विजय माणिकराव मुरडकर (वय ३९) यांनी ३ फेब्रुवारी रोजी दुपारी स्वतःच्या शेतातील गोठ्यात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दुपारी सुमारे तीनच्या सुमारास हा प्रकार लक्षात येताच त्यांच्या भावाने रायपूर पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलढाणा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. विजय मुरडकर हे अल्पभूधारक शेतकरी असून नापिकी व बँकेच्या कर्जाच्या तणावामुळे ते चिंतेत असल्याची माहिती समोर आली आहे.
मृतकाच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ व एक बहीण असा परिवार असून गावात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!