बुलढाणा:- जिल्हा कारागृहाच्या मागे असलेल्या शाळेजवळ बुधवारी एक मृत अर्भक आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. अर्भकाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा ‘डीएनए’ नमुना सुरक्षित ठेवण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी श्रीकांत धारकरी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, अर्भकाच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.