कोलवड ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर शिस्तभंग व आर्थिक गैरप्रकाराचा ठपका

 

बुलढाणा : – कोलवड ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी गणेश पायघन यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. शासकीय आदेश, सेवा आचारसंहिता तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, आर्थिक गैरव्यवहाराचाही ठपका नोंदवण्यात आला आहे.
या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडे सविस्तर अहवाल सादर करण्यात आला असून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आपल्यावर लावण्यात आलेले आरोप अन्यायकारक असल्याचा दावा करत गणेश पायघन यांनी न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे.
या प्रकरणामुळे ग्रामपंचायत प्रशासनात खळबळ उडाली असून पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!