Headlines

नूतन विद्यालयाच्या सोनल खर्चेची राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरी

मलकापूर: नूतन विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या १७ वर्षाखालील विद्यार्थीनी कुमारी सोनल गणेश खर्चे हिने राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक मिळवून शाळेचे व संपूर्ण शहराचे नाव उज्ज्वल केले आहे.ही स्पर्धा मध्य प्रदेशातील देवास येथे २० डिसेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान पार पडली. अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने छत्तीसगड संघावर मात करत शानदार विजय संपादन केला. या विजयामध्ये सोनल खर्चे हिच्या उत्कृष्ट खेळाचे मोठे योगदान ठरले. तिच्या कामगिरीचे सर्व स्तरांवर कौतुक होत आहे.

लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळ, मलकापूरच्या संचालक मंडळाने सोनलचे अभिनंदन करत तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नूतन विद्यालयाचे प्राचार्य ए. डी. बोरले, पर्यवेक्षक पी. एस. टेकाडे, क्रीडाशिक्षक डी. एस. राठोड, भारंबे सर तसेच सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनीही तिच्या यशाचा गौरव केला. आपल्या यशाचे श्रेय सोनलने लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळ, शाळेतील शिक्षकवर्ग, प्रशिक्षक आणि तिच्या आई-वडिलांना दिले आहे. सोनलच्या या यशामुळे नूतन विद्यालयाची शान वाढली असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांवरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!