Headlines

समृद्धी महामार्गावर झोप लागून अपघात : १ ठार, १ गंभीर

दुसरबीड :- मध्यरात्री दुसरबीड टोलनाक्याजवळ समृद्धी महामार्गावर आयशर वाहन (MH-20-EG-5075) झोप लागल्याने अपघात झाला. चालक गणेश गायकवाड (४०, संभाजीनगर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सहप्रवासी मच्छिंद्र क्षीरसागर गंभीर जखमी झाले. आयशरने महामार्गावरील लोखंडी पोलला जोरदार धडक दिली.

अपघाताची माहिती मिळताच १०८ अॅम्बुलन्स व महामार्ग यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी सिदंखेडराजा येथे हलविण्यात आले. महामार्ग पोलीस व सुरक्षा पथकाने वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास पोस्टे किनगाव राजा पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!