Headlines

मलकापूर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ,दोन घरे फोडले, दाग दागिन्यांसह ५५ हजारांचा मुद्देमाल लंपास

मलकापूर :- घराचा कडी कोंडा तोडून डाग दागिने व रोख रक्कम असा एकूण ५५ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना दि.18 मे ते 20 मे दरम्यान शहरातील मधुवन नगर येथे घडली. याप्रकरणी ( रीना सुरवाडे वय 24 )रा. मधुबन नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी तक्रारी म्हटले आहे कि त्यांचे आई वडील भाऊ हे इंदोर येथे राहत असतात.घराला कुलूप लावून फिर्यादी त्यांना भेटण्यासाठी दि 18 मे रोजी गेल्या होत्या. फिर्यादी यांना फोन करून सांगितले की तुमच्या घराचे कुलूप तुटलेले असून दरवाजा उघडा आहे. फिर्यादी यांनी घरात जाऊन पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडून दिसले. त्यांनी घरातील लोखंडी अलमारी मध्ये ठेवलेले 30 हजार रुपये 5 ग्राम सोन्याची पोत अंदाजे 25000 रुपये, चोरी झाल्याचे लक्षात आले. तसेच शेजारी राहत असलेले सुरेश डोके यांच्या घरी भाड्याने राहणारे अनिल राजू धनगर यांचे सुद्धा घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरी कोणी नसल्याचे संधी साधत चोरट्याने हात साफ केला. दोन दिवसात दोन घरफोड्या झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!