बुलढाणा मतदारसंघातील ५ बुथवरील ईव्हीएमची पडताळणी होणार! जयश्री शेळकेंनी निवडणूक विभागाकडे भरले २.६० लाख रुपये

बुलढाणा :- मतदारसंघात झालेल्या शिंदे गट विरुद्ध उद्धव गटाच्या थेट लढतीत जयश्री शेळके ८४१ मतांनी पराभूत झाल्या होत्या. या पराभवाला आव्हान देत त्यांनी पाच बुथवरील ईव्हीएम मशीनची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी निवडणूक विभागाकडे २.६० लाख रुपये रक्कम जमा केली आहे.

जिल्हा निवडणूक विभागाने मार्गदर्शनासाठी निवडणूक आयोगाशी संपर्क केला आहे. मॉक पोल अधिकारी व तांत्रिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत ईव्हीएम तपासणी होणार असून, व्हीव्हीपॅट पडताळणी करण्यात येणार नाही. तपासणी पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएममधील डाटा डिलीट करण्यात येईल.

बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच ईव्हीएम तपासणी प्रक्रिया होत आहे. नियमांनुसार ५% म्हणजे १७ बुथ तपासता येतात. मात्र, या प्रकरणात फक्त ५ बुथवरील ईव्हीएमची तपासणी होणार आहे. जयश्री शेळकेंच्या निर्णयामुळे मतदारसंघात चर्चेला उधाण आले आहे आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!