
मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची गैरहजेरी नित्याचीच, रुग्णांचे जीव धोक्यात; उपजिल्हा रुग्णालयाला कायमस्वरूपी डॉक्टर मिळणार का ?
मलकापूर( दिपक इटणारे ):- विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर शहरात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे रुग्णांचे जीव धोक्यात आले आहेत. या रुग्णालयावर तालुक्यातील हजारो नागरिक अवलंबून आहेत. मात्र, येथे कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या एका अपघातात एका तरुणाला रुग्णालयात…