
शाळा सुरू होऊन सहा महिला उलटले; मलकापूर जिल्हा परिषद शाळांमध्ये गणवेश वाटप रखडले; गुरुजी गणवेश केव्हा मिळणार विद्यार्थ्यांची ओरड
मलकापूर( दिपक इटणारे ) :- तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मोफत गणवेशांचे वाटप अद्याप झालेले नाही. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन सहा महिने उलटूनही गणवेश उपलब्ध न झाल्याने विद्यार्थी साध्या कपड्यांमध्ये शाळेत येत आहेत. गणवेश वाटप ही योजना शिक्षणातील समानता व शिस्तीला चालना देण्यासाठी शासनाने राबवली आहे. मात्र, यंदा निविदा प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे गणवेश…