vidharbh

दुचाकीला मॉडीफाईड सायलेन्सर बसवून फटाके फोडणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईची गरज, मलकापुरात मॉडीफाईड वाहनांची संख्या वाढली!

  उमेश ईटणारे मलकापूर :- दुचाकीला मॉडीफाईड सायलेन्सर बसवून फटाके फोडणाऱ्या व वेडीवाकडी दुचाकी चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईची गरज निर्माण झाली आहे. मलकापुरात काही दुचाकी वाहन चालकांकडून दुचाकीचे सायलेन्सर बदलवून तिला मॉडिफाइड सायलेन्सर बसविले आहे. या मॉडिफाइड सायलेन्सर मधून कर्कश आवाज येत असतो अश्या वाहनांमधून ध्वनी प्रदूषण होत असून नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा…

Read More

गुलाबाच्या फुलांची उधळण, गणपती बाप्पा मोरया चा जयघोष, ढोल ताशाच्या तालावर तरुणांनी घेतलेला ठेका अधून मधून पावसाचा कहर व मलकापूर पोलीस प्रशासनाचे उत्कृष्टनियोजन अश्या भक्तिमय वातावरणात बाप्पा झाले विराजमान

मलकापूर:- ( दिपक इटणारे ) गुलाबाच्या फुलांची उधळण, गणपती बाप्पा मोरया चा जयघोष, ढोल ताशाच्या तालावर तरुणांनी घेतलेला ठेका अधून मधून पावसाचा कहर व मलकापूर पोलीस प्रशासनाचे उत्कृष्टनियोजन अश्या भक्तिमय वातावरणात लहान मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळामध्ये बाप्पा विराजमान झाले. शनिवारपासून दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. भक्तिमय वातावरणात घराघरांत आणि लहान-मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये बाप्पा…

Read More

मलकापुरातील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीच्या घटनेतील आरोपीला आठ महिन्यानंतर जळगाव खा. मधून अटक! चांडक विद्यालय रोडवर घडली होती घटना

मलकापूर : शहरात २९ जानेवारी रोजी घडलेल्या मंगळसूत्र चोरीचा छडा लावण्यात बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून मुख्य आरोपीस जळगाव खांदेशमधून अटक करण्यात आली. दरम्यान, त्याच्या फरार साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे.शहरातील देशपांडे गल्लीत राहणाऱ्या ऋतुजा श्रेयस व्यवहारे २९ जानेवारी रोजी स्कुटीने जात असताना त्यांच्यामागून दुचाकीवरून दोन युवक आले. त्यांनी ऋतुजा व्यवहारे गळ्यातील ४०…

Read More

बेलाडच्या सरपंचाविरोधात अविश्वास पारित

मलकापूर:- तालुक्यातील बेलाड ग्रामपंचायत सरपंचाविरोधात ८ विरुद्ध शून्य मतांनी अविश्वास ठराव पारित करण्यात आला. अविश्वास ठरावावर तहसीलदार राहुल तायडे यांच्या अध्यक्षतेखाली ५ सप्टेंबर रोजी बैठक पार पडली. बेलाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह आठ सदस्यांनी २ सप्टेंबर रोजी विद्यमान सरपंच सचिन संबारे पाटील यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला होता. त्यात विकास कामात विश्वासात न घेणे, करवसुलीत पुढाकार न…

Read More

हिंगणा काझी ग्रामवासियांच्या समस्येसाठी तहसीलदारांना निवेदन, मागणीची दाखल न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा

मलकापूर :- आज दिनांक 05.09.2024 ला हिंगणा काझी ग्रामवासी यांनी गावातील शेत रस्ता तात्काळ पक्का करून मिळणे बाबत तसेच व्याघ्रा नदीवरील पुलाची निर्मिती तात्काळ करून देणे बाबत वंचित चे तालुका नेते अजय सावळे यांच्या नेतृत्वात आणि सुशील मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार राहुलजी तायडे तसेच विस्तार अधिकारी होळकर साहेब यांना संयुक्तपणे निवेदन दिले. सविस्तर बातमी…

Read More

लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी बाजारपेठ सजली, लाडक्या गणरायाच्या सजावटीच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी!

  उमेश ईटणारे मलकापूर :- लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी काही दिवसच शिल्लक राहिल्याने गणेश भक्तांनी बाप्पांच्या स्वागतासाठी बाजारपेठेत वेगवेगळ्या सामानांची खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांचीं बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळत आहे. येत्या 7 सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पांचे आगमन होणार आहे. बाप्पांच्या आगमनासाठी काही दिवसच शिल्लक राहिल्याने घरगुती गणपती बुक करण्यासाठी बाजारापेठेत नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. तसेच, नागरिक…

Read More

किरकोळ वादातून चाकूने वार, एक जण जखमी, मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : येथील मंगल गेट परिसरात बांधकामांचे साहित्य ठेवण्याच्या किरकोळ वादातून एकाला चाकूने भोसकून जखमी केल्याची घटना आज, ४ सप्टेंबर रोजी मंगल गेट परिसरात घडली. मलकापूर येथील आरोपी राजेश प्रेमचंद शर्मा (वय ५०, रा. मंगल गेट) व निलेश प्रकाश सोनोने या दोघांत सार्वजनिक जागेवर बांधकाम साहित्य ठेवण्यावरून आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास वाद निर्माण झाला….

Read More

धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या, शेगाव रेल्वे स्थानकावरील धक्कादायक घटना!

शेगाव : धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन 28 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल दि.४ सप्टेंबरला शेगाव रेल्वे स्थानकावर घडली.या घटनेचा व्हिडिओ सिसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.( सौ.अर्चना अनंता महाले )(२८) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार विवाहिता ही खामगाव तालुक्यातील अटाळी येथील आहे. अर्चना यांचा विवाह अटाळी येथील अनंता महाले यांच्याशी झाला…

Read More

मलकापूरचे उद्योजकांनी गाठला यशाचा शिखर, कोलते अभियांत्रिकी मधील माजी विद्यार्थी कार्तिक खाचणे, आनंद जैन आणि प्रशिस हिवराळे यांना सर्वोत्कृष्ट स्टार्टअप उद्योजक पुरस्काराने सन्मान

मलकापूर: पद्मश्री डॉ. व्ही.बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर, येथील मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातील प्रतिष्ठित माजी विद्यार्थी श्री कार्तिक खाचणे यांना कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील अपवादात्मक योगदानाबद्दल सर्वोत्कृष्ट स्टार्टअप उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या गौरव सोहळ्यात मलकापूर येथील आनंद कन्स्ट्रक्शनचे मालक श्री आनंद जैन आणि बुलढाणा येथील मातृ एंटरप्रायझेसचे मालक श्री प्रशिस हिवराळे यांनाही सर्वोत्कृष्ट स्टार्टअप…

Read More

घराला वीज स्पर्श करून गेल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक, मलकापूर तालुक्यातील यशोधाम येथील घटना!

मलकापूर : येथील यशोधाम येथे घराला वीज स्पर्श करून गेल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक सामान जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. दमदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे यशोधाम येथे घराला वीज स्पर्श करून गेल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मलकापूर तालुक्यात २ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाने दमदार पावसाने हजेरी लावली होती….

Read More
error: Content is protected !!