Headlines

भर रस्त्यावर कामगाराच्या हातातील तीन लाखांहून अधिक रक्कम असलेली पिशवी हिसकावून चोरट्याचे पलायन, आसलगाव येथील घटना

 

आसलगाव :- येथे एका देशी दारू दुकानातील रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या कामगाराच्या हातून अज्ञात चोरट्याने ३ लाख ३४ हजार रुपयांची पिशवी हिसकावून पलायन केले. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. बाबुराव रामभाऊ चोपडे हे गेल्या १५ वर्षांपासून गोविंद भिकारी अग्रवाल यांच्या देशी दारू दुकानातील रोकड सांभाळण्याचे व ती बँकेत भरण्याचे काम करतात. दिलीप हिस्सल हेही दुकानातील विक्री आणि संगणक कामकाज पाहतात. नेहमीप्रमाणे, २१ फेब्रुवारीला दुकानातील रोकड मोजून एका पांढऱ्या पिशवीत ठेवण्यात आली. दुकान बंद करून बाबुराव चोपडे रोख रक्कम घेऊन अग्रवाल यांच्या घराकडे जात असताना अचानक अज्ञात चोरट्याने पिशवी हिसकावली आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला. ही घटना भररस्त्यावर घडल्यामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस चोरी आणि लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याची मागणी होत आहे.
या प्रकरणी बाबुराव चोपडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!