Headlines

सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात, रुग्णवाहिकेचे नुकसान, सुदैवाने जिवित हानी नाही

बुलडाणा : हैदराबादहून सिल्लोडकडे लिक्विड सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकचा मेहकर शहरातील महावितरण कार्यालयाजवळ अपघात झाला. हा अपघात रविवारी, १ डिसेंबर रोजी रात्री घडला. अपघातात रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका रुग्णवाहिकेचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, रात्रीच्या वेळेस परिसर निर्मनुष्य असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
एपी-३९-वाई-०३६६ क्रमांकाचा ट्रक लिक्विड सिमेंट घेऊन सिल्लोडकडे जात होता. रात्री महावितरण कार्यालयाजवळ तो अचानक उलटला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. हा अपघात जीवितहानीविना आटोक्यात आला असला तरी, रुग्णवाहिकेचे नुकसान आणि वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!