Headlines

ढाब्या समोर उभा असलेला ट्रक चोट्यांनी पळविला, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल!

 

अकोला :- अकोल्यातील एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर २० डिसेंबर रोजी एका ढाब्यासमोर उभा केलेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात २३ डिसेंबर रोजी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस ट्रकचा शोध घेत आहेत. शिवाजी नगर, शिवणी परिसरातील रहिवासी भारत मानीकराव मुरुमकार यांनी एम एच ३० बीडी ६४०६ क्रमांकाचा ट्रक त्यांच्या घरासमोर लावला होता. मात्र, चोरट्यांनी हा ट्रक पळविला. मालकाने शोध घेतला, पण ट्रकचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर, त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी तांत्रिक कारणांमुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब केला. २३ डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरलेल्या ट्रकाची अंदाजे किंमत सहा लाख रुपये असल्याचे ट्रकमालक भारत मुरुमकार यांनी नमूद केले आहे.पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!