खामगावः येथील बसस्थानकावर बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरटयाने एका इसमाच्या खिशातील २० हजार रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.येथील देशमुख प्लॉट भागातील मनोज बलराम मावळे वय ५६ हे २८ सप्टेंबर रोजी कामाकरीता दवाखान्याच्या अकोला जाण्यासाठी खामगाव बसस्थानकावर आले. यावेळी बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेवून अज्ञात चोरटयाने मावळे यांच्या खिशातील २० हजार रुपये लंपास केले. काही वेळाने ही घटना उघडकीस आली.याबाबत त्यांनी शहर पोस्टेला तक्रार दिली असून यावरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द कलम ३०३(२) भा. न्या. सं. नुसार गुन्हा दाखल केला आहे.