Headlines

बहुजन उद्धारक सेवा समितीच्या वतीने सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

मलकापूर :- सावित्रीबाई फुले जयंती अर्थात बालिका दिनानिमित्त बहुजन उद्धारक सेवा समितीच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. येथील स्वामी विवेकानंद आश्रम येथील अभ्यासिकेत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी सावित्रीबाईंच्या विचार व कार्याला अभिवादन करण्यासाठी शहरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात मिलिंद डवले, अश्विनीताई काकडे बहुजन उद्धारक सेवा समितीचे सचिव संतोष बोंबटकार, सहसचिव दिपक बावस्कर, कोशाध्यक्ष मंगेश सातव, विवेकानंद आश्रम अभ्यासिकेतील अनिल केले यांचेसह मोठ्या संख्येने वाचक अभ्यासक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!