Headlines

म्हणे मला तुझ्या सोबत.. महिलेचा वाईट उद्देशाने हात धरून मारहाण, एका विरुद्ध गुन्हा दाखल; मलकापूर शहरातील घटना!

मलकापूर : मला तुझ्या सोबत शारिरीक संबंध करू दे असे म्हणून वाईट उद्देशाने हात धरला व मी नकार दिला म्हणून मला मारहाण केली. अशी फिर्याद ३८ वर्षीय महिलेने मलकापूर शहर पो.स्टे. ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

खामगाव येथे महावितरण कंपनीत नोकरीवर असलेल्या व मलकापूर येथील रहिवासी असलेल्या ३८ वर्षीय महिलेने आज ४ डिसेंबर रोजी मलकापूर शहर पो.स्टे. ला दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, माझे पती हे एमएसईबीमध्ये नोकरीला होते. ते २०२२ मध्ये मयत झाले. त्यानंतर माझे पती सोबत अमोल भास्कर सावळे रा. नालंदानगर मलकापूर हे एमएसईबीमध्ये वारमन म्हणून कामाला होते. त्यांचे सोबत आम्ही नालंदानगर येथे राहत होतो. माझे पती मयत झाल्यानंतर अमोल सावळे याने माझेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला व मला म्हणाला की तुझ्या पतीने माझ्याकडून ३ लाख रू. घेतले आहे ते परत दे
नाहीतर शारिरीक संबंध करू दे
असे म्हणत होता. ४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता मी मलकापूर येथील बुलढाणा रोडवरील जनता कॉलेज जवळ खामगावला एमएसईबीमध्ये जात असतांना त्याने मला मोटार सायकलवर येऊन शिविगाळ करीत पट्टयाने मारहाण केली. त्यानंतर मला दोन ठिकाणी फिरवून शहरातील हॉटेल राधेयवर घेवून गेला. तेथे मी रूम करतो त्या रूममध्ये चाल व तुझेसोबत शारिरीक संबंध करू दे अशा वाईट उद्देशाने हात धरला. मी नकार दिला असता तेथे सुध्दा त्याने मला चापटा, बुक्क्याने मारहाण केली. तसेच माझी तक्रार केल्यास तुला जिवाने मारून टाकेल अशी धमकी दिली.अशा तक्रारीवरून मलकापूर शहर पो. स्टे. मध्ये गुन्हा क्र. ०७४०/२४ कलम बीएनएस २०२३-७४, ७५, ७८, २९६, ११५ (२), १५१ (२), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!