Headlines

बहिणीच्या लग्नाची शिदोरी आणण्यासाठी वाघूळला जात असताना उभ्या ट्रकवर दुचाकी आदळली,एक युवक जागीच ठार, तर एक जखमी, नांदुरा मलकापूर रोडवरील घटना

नांदुरा :- उभ्या ट्रकवर दुचाकी आदळून एक युवक जागीच ठार, तर एक जखमी झाल्याची घटना काल दि.१७ जून रोजी सकाळी नांदुरा मलकापूर रोडवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर वडनेर भोलजी येथील टाटा सर्विस सेंटर समोर रस्त्यावर घडली.

याबाबत फिर्यादी प्रशांत सखाराम लाहुडकर रा.भूत बंगला शेगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार प्रज्ज्वल दशरथ काळे (वय २०) रा. दसनूर तालुका रावेर व शुभम मुकुटराव निळे रा. नारखेड तालुका शेगाव हे दोघे बहिणीच्या लग्नाची शिदोरी आणण्याकरिता वाघूळला जात होते. यावेळी नांदुऱ्यावरून मलकापूरकडे जात असताना आरजे ३९, जीए १६०२ या क्रमांकाचा मालवाहू ट्रक निष्काळजीपणे रत्यावर उभा होता.दरम्यान, दुचाकी स्वारास ट्रक सुरू असल्याचा भास झाला त्यामुळे त्याची एमएच ३०-एके २८२८ या क्रमांकाची दुचाकी उभ्या ट्रकवर जाऊन आदळली. त्यामुळे प्रज्वल दशर काळे यांच्या डोक्याला मार लागून त्याचा जागेवरच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला शुभम निळे हा जखमी झाला. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी ट्रक चालकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अंमलदार संजय निंबोळकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!