मलकापूर-कुऱ्हा गोतमारा मार्गावर अपघात, बस खोल चरीत उतरली; 10 ते 12 प्रवासी जखमी!

 

धामणगाव बढे : – मलकापूर ते कुऱ्हा गोतमारा मार्गावर सुरू असलेल्या रस्ता कामामुळे बस अपघाताची घटना घडली. बस क्रमांक MH 40 N 9486 रस्त्याशेजारील खोल चरीत उतरल्याने १० ते १२ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली. रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून मातीच्या भरावाचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस चरीत उतरली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रस्त्याच्या कामादरम्यान योग्य सुरक्षा उपाय न केल्यानेच अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!