Headlines

एसटी बस व मोसंबीची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात, 6 ठार तर 18 जखमी, शहापूर जवळील घटना

वृत्तसेवा

जालना – मोसंबीची वाहतूक करणारा – आयशर टेम्पो व राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये – झालेल्या अपघातात ६ जण ठार तर १८ प्रवासी जखमी – झाले आहेत. जखमींपैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. – जालना जिल्ह्यातील वडीगोद्री रोडवरील शहापूर गावाजवळ शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास ही घटना घडली.अपघात एवढा भीषण होता की पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. महामंडळाची बस बीड जिल्ह्यातील गेवराई येथून जालन्याकडे जात होती तर टेम्पो हा जालन्याहून बीडकडे मोसंबी घेऊन जात होता.दुसऱ्या वाहनाला मागे सारून पुढे जाण्याच्या घाईत आयशर समोरून येणाऱ्या बसवर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला, बसमध्ये एकूण २४ प्रवाशी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!