Headlines

भरधाव कारने पादचाऱ्याला उडवले, अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू, वडनेर भोलजी जवळील घटना!

 

 

नांदुरा : भरधाव कारने दिलेल्या
धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना काल दि.१३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर असलेल्या वडनेर भोलजी शिवारातील गुरुकृपा हॉटेल समोर घडली. वडनेर भोलजी येथील रहिवासी असलेले रमेश सोपान भोपळे हे एका धाब्यावर कामाला होते. काल १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ते वडनेरवरून मलकापूरकडे धाब्यावर काम करण्यासाठी जात होते. त्यावेळी मलकापूरकडून वडनेरकडे येणाऱ्या एमएच-१९-सीव्ही- २४७८ च्या कारचालकाने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे व भरधाव वेगाने चालवून रमेश सोपान चोपडे यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कारचालक संतोष कन्हैया तेलंग (रा. निंभोरा ता.भुसावळ) याने जखमीला उचलून तत्काळ मलकापूर येथील रुग्णालयाकडे निघाला. मात्र, वाटेतच रमेश भोपळे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कौतिक चोपडे यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी कारचालक संतोष कैन्हया तेलंग यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम २८१, १०६ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार संजय निंबोळकर हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *