दिव्यांग जागतिक दिनानिमित्त दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्था कडून विविध मागण्या मान्य करण्याकरिता भव्य मोर्चा

बुलढाणा :- आज दिनांक 3 डिसेंबर रोजी बुलढाणा येथे दुपारी बारा वाजता दिव्यांग जागतिक दिनानिमित्त बुलढाणा येथे दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्था मलकापूर यांचे कडून विविध मागण्या पूर्ण व्हाव्या या उद्देशाने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये भारत माता की जय, वंदे, मातरम्, दिव्यागाच्या मागण्या पूर्ण करा अश्या प्रकारची नारे बाजी करण्यात आली तर बुलढाणा जिल्ह्यातील दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्था मधील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी दिव्यांग माता बहिणी व पुरुष यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता मोर्चा ची सुरुवात जिल्हा परिषद कार्यालय बुलढाणा येथून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत सर्व दीव्याग महिला पुरुषांनी पायदळ चालून अती जोषात करण्यात आली त्यावेळी दिव्यांग सेवाभावी बहुद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष नागेश सुरंगे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष रामदासजी सपकाळ जिल्हा सचिव अनिल कुमार गोठी मलकापूर तालुकाप्रमुख रवींद्र जंगले मलकापूर शहर प्रमुख सुनील इंगळे मलकापूर शहर उपप्रमुख मुरलीधर इंगळे मलकापूर शहर सचिव राजू रोडे शहर मलकापूर सहसचिव अमर सालवानी कोषाध्यक्ष संजय रायपुरे संतोष भाऊ संस्थेच्या मलकापूर शहर प्रमुख पूनम ताई भारंबे मलकापूर शहर उपप्रमुख कल्पना तायडे मलकापूर शहर सचिव अर्चना वानखेडे व संघटनेचे इतर कार्यकर्ते व पदाधिकारी मोर्चामध्ये सहभागी होते.

Leave a Comment

error: Content is protected !!