खामगाव :- टाकळी फाटा येथील रस्त्यावर एक दुर्दैवी अपघात घडला असून, त्यात शिक्षक मोहन त्र्यंबक सालवे गंभीर जखमी झाले आहेत. शाळेतून घरी जात असताना समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला, ज्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे.धडक दिलेल्या वाहनाचा क्रमांक एम. एच. १२ जीएफ ४४३९ असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी जखमी शिक्षकांचा भाऊ दिलीप सालवे यांनी ९ डिसेंबर रोजी बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, त्यानंतर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे.सध्या, मोहन त्र्यंबक सालवे यांना उपचारासाठी संभाजी नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस अधिकारी सारंग नवलकर पुढील तपास करत आहेत.